आँखो देखा हाल

शारदा नवले

(भीमा कोरेगाव – सणसवाडी)

भीमा कोरेगाव येथील ‘विजयी स्तंभ’ हा बहुजन अस्मितेचे प्रतिक आहे. ते आपले प्रेरणास्थान आहे.
भीमा कोरेगावातील शहीद शूरवीर पूर्वजांना मानवंदना देण्यासाठी व सणसवाडी येथे भरलेल्या ‘राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलना’ त सहभागी होण्यासाठी मी व इतर कवी-कार्यकर्ते दि. 31.12.2017 व 01. 01. 2018 हे दोन दिवस उपस्थित होतो.
दि. 01. 01.2018 रोजी सशस्त्र जातियवाद्यांनी भीमा कोरेगाव, शिक्रापूर.,सणसवाडी, पेरणे येथील गावे बंद पाडली. भीमा कोरेगाव या ठिकाणी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आलेल्या नि:शस्त्र व शांतीप्रिय बहुजनांवर जातियवाद्यांनी भ्याड हल्ला केला, शेकडो वाहनांची तोडफोड केली, लोकांना रक्तबंबाळ केले, रस्ते बंद केले, सकाळपासूनच सर्व दुकाने बंद ठेवली की जेणेकरून लोकांना अन्न – पाणी मिळू नये. बिल्डिंगमधील लोक दगडांचा – बाटल्यांचा वर्षाव करीत होते. यासंबंधीच्या बातम्या व videos आपण पाहिलेच असतील.

सणसवाडी येथील निष्ठावंत कार्यकर्ते ‘सुदामदादा पवार (वय 80 वर्षे) यांच्या घराजवळील मालकी हक्काच्या जागेत’ राज्यस्तरीय बौद्ध साहित्य संमेलन भरले होते. गेली अनेक वर्षे सुदामदादा पवार आणि त्यांचे कुटुंबीय भीमा कोरेगाव येथे नतमस्तक होण्यासाठी आलेल्या बहुजनांचे आदरातिथ्य करतात.
दि. 01 01.2018 रोजी झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ सुदामदादा पवार यांनी अज्ञात इसमांच्या विरोधात स्थानिक पोलीस ठाण्यात N. C. नोंदविली. या दिवशी दुपारी भयभीत व जखमी झालेले शेकडो लोक जीव मुठीत धरून त्यांच्या घरी आले. त्यांनी त्यांची विचारपूस करुन त्यांना धीर दिला, अन्न – पाणी आसरा दिला. साहित्य संमेलनाला पोलिस प्रोटेक्शन देण्याची मागणी केली. परंतु ती मिळाली नाही.
रस्ते बंद केल्यामुळे आम्ही सर्व परिस्थितीचा आढावा घेऊन संध्याकाळी चाकणमार्गे परतीच्या प्रवासाला लागलो. रस्त्यावर ठिकठिकाणी असहाय्य स्त्रिया, बालके, तरुण – तरुणी, वृद्ध भेटत होते. रस्त्यावर काचा दिसत होत्या. तोडफोड झालेली वाहने दिसत होती.
इकडे मात्र सणसवाडी येथे साहित्य संमेलनाच्या समारोपानंतर अंधार झाल्यावर सुदामदादा पवार यांच्या घरावर जातियवाद्यांनी भ्याड हल्ला केला. साहित्यिक-कार्यकर्त्यांच्या 7-8 गाड्या फोडल्या. गेट व मंडप तोडले. एवढेच नव्हे तर त्यांचे शेतही जाळले. काल दुपारपर्यंत 100-150 महिला त्यांच्या घरी आसऱ्याला होत्या. सध्या सुदामदादा पवार यांना पोलीस प्रोटेक्शन मिळाले आहे.

मनूस्मृती केव्हाच जिवंत झालेली आहे. फक्त ती डिक्लेअर करणे बाकी आहे. मनूस्मृतीनुसार बहुजनांना अर्थात शूद्र – अतिशूद्रांना संपत्ती ठेवण्याचा अधिकार नाही. त्यानुसारच मानवंदना देण्यासाठी आलेल्या बहुजनांच्या वाहनांची तोडफोड करण्यात आली. ‘तुम्ही आमचे गुलाम आहात’ हेच यातून सूचित होते. या भूमीत बुद्धांचे विचार गाडले होते, ते डाॅ. बाबासाहेब आंबेडकरांनी पुनर्जीवित केले. आता डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे विकृतीकरण करुन ते गाडले जात आहेत.
हजारो वर्षांपासून आपल्या बहुजनांवर अत्याचार होत आलेले आहेत. व आपण त्याविरोधात संघर्षही करत आहोत.
वरील भ्याड हल्ल्याच्या विरोधात आपल्या अस्मितेसाठी व न्यायहक्कांसाठी बौद्ध बांधव रस्त्यावर उतरला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून आपल्या समाजातील विद्वान मंडळी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांसोबत होती. 1956 च्या धम्म दीक्षेनंतर मात्र ‘पँथर’ बौद्ध समाज एकटा लढतो आहे व आपण मात्र आरक्षणाची गाजरे चाखत आहोत. हे कुठपर्यंत चालणार?
आपण आपले खरे मित्र व शत्रु ओळखायला हवेत व न्यायहक्कांसाठी बौद्ध बांधवांसोबत प्रत्येक लढ्यात सामील व्हायला हवे….. गुजरातमधील ऊना प्रकरण, उ. प्र. तील सहारणपूर, बुलढाण्यातील नग्न धिंड प्रकरण, बहुजन विचार वंतांवरील सशस्त्र भ्याड हल्ले व त्यांचे खून !!! यातून बोध घ्यावा…. नाहीतर नवी पेशवाई अवतरली आहे. लवकरच गळ्यात मडकं व कमरेला झाडू आल्याशिवाय राहणार नाही!!!अर्थात खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरणाच्या या युगात प्रतिके बदलतील पण वर्णीय – वर्गीय शोषण मात्र तसेच राहील.

 

 

Note: INKalab doesn’t condone any kind of violence. We would like for all voices to be heard loud and clear and for the government to take actions against wrongdoers. It is not for any civilian to decide who was in the Right or Wrong. Requesting all parties involved to maintain peace. We stand in solidarity with Dalits in this matter and hope everything is resolved with Peace.

This article is subject to Copyright. The content belongs to Mrs Sharda Navle

the Featured Image is property of CPIM Speak (www.cpim.org)

Advertisements

One thought on “आँखो देखा हाल

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s